CSK vs KKR : ईडन गार्डन्सवर चेन्नईच 'अजिंक्य'; कोलकात्याचा 49 रन्सने पराभव

या सामन्यामध्ये कोलकात्याचा त्यांच्याच घरात पराभव झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 235 रन्सच्या टारगेटचा सामना करताना कोलकात्याला नाकीनऊ आले. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलवर टॉपवर पोहोचलीये.

Updated: Apr 23, 2023, 11:37 PM IST
CSK vs KKR : ईडन गार्डन्सवर चेन्नईच 'अजिंक्य'; कोलकात्याचा 49 रन्सने पराभव title=

CSK vs KKR : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये कोलकात्याचा त्यांच्याच घरात पराभव झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 235 रन्सच्या टारगेटचा सामना करताना कोलकात्याला नाकीनऊ आले. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलवर टॉपवर पोहोचलीये.

रिंकू-रॉयची खेळी व्यर्थ

236 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. 1 रनवर त्यांनी दोन विकेट गमावलेले. मात्र त्यानंतर जेसन रॉयने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन रॉयने 26 बॉल्समध्ये 5 फोर मारत 61 रन्स केले. त्याच्यासोबत रिंकू सिंगनेही चांगली फलंदाजी केली. दोघांनी मिळून 5व्या विकेटसाठी 65 रन्स केले. 

चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि महेश थिक्शाना यांनी 2-2 तर आकाश सिंग, मोईन अली, रवींद्र जडेजा आणि पाथीराना यांनी 1-1 विकेट मिळाली. या विजयामुळे चेन्नईचे आता 10 पॉईंट्स झाले आहेत.

चेन्नईकडून डोंगराएवढं लक्ष्य

चेन्नईने कोलकात्यासमोर 236 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 235 रन्स केले. सध्याच्या सिझनमधील ही सर्वोच्च धावसंख्या होती. ही धावसंख्या उभारण्यात मोठा वाटा होता तो अजिंक्य रहाणेचा. 

अजिंक्य रहाणेची तुफान खेळी

आज ईडन गार्डन्सच्या मैदानावर अजिंक्य रहाणे नावाचं तुफान आलं होतं. आजच्या सामन्यात तुफानी खेळी खेळताना 24 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं. या सिझनमधील हे त्याचं दुसरे अर्धशतक ठरलंय. त्याचवेळी, आयपीएल कारकिर्दीतील हे 30 वं अर्धशतक होतं. 29 बॉल्समध्ये अजिंक्यने 71 रन्सची खेळी केलीये.

प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 73 रन्सची भागीदारी केली. यावेळी कॉनवे 40 बॉल्समध्ये चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 56 रन्स केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेने गोलंदाजांना चांगलंच चोपलं. दोघांनी 34 बॉल्समध्ये 85 रन्सची भागीदारी केली. तर रवींद्र जडेजा १८ रन्स केले. कोलकाताकडून कुलवंतने दोन विकेट्स घेतल्या.