भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचं संकट

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना  तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडिअमवर रंगणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे जो शेवटचा सामना जिंकेल सिरीज त्याच्या नावावर होणार आहे.

Updated: Nov 7, 2017, 10:53 AM IST
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचं संकट title=

मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना  तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडिअमवर रंगणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे जो शेवटचा सामना जिंकेल सिरीज त्याच्या नावावर होणार आहे.

तिसरा टी-२० सामना कोण जिंकणार याबाबत उत्सूकता असतानाच या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने क्रिकेटप्रेमी थोडेफार नाराज झाले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातीस निर्णायक सामना देखील पावसामुळे खराब झाला होता. आता या सामन्यावरही हवामान खात्यानं पावसाचं सावट असल्याची भविष्यवाणी केल्याने क्रिकेट सामन्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताने पहिल्या टी-२० सामन्यामध्ये न्यूझीलंडला 53 रनने हरवलं होतं. पण दुसऱ्या सामना न्यूझीलंडने ४० रनने जिंकला होता. त्यामुळे सिरीजचा फैसला हा आता अंतिम सामन्यावर आला आहे. त्यामुळे या निर्णायक सामन्यावर अनेकांचं लक्ष असणार आहे.