मुंबई : भारताचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहलचे कर्णधार विराट कोहलीशी जवळचे नाते आहे. आयपीएलमध्ये दोघेही बंगळूरु संघाकडून खेळले होते. युझवेंद्रने अनेकदा इंटरव्हूयमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीची स्तुती केलीये. नुकताच युझवेंद्रने गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाबाबत त्याने सहकारी खेळाडू, क्रिकेटर आणि परदेशी क्रिकेटरसोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या. युझवेंद्र चहलने कर्णधार कोहलीची स्तुती करताना म्हटले, विराट भय्या मला नेहमी प्रेरणा देतो. मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो माझी मदत करतो.तो नेहमी म्हणतो की माझी लाईफ चेंज झालीये आणि मला फिट राहिले पाहिजे. आता मला फिटनेसचे महत्त्व समजू लागलेय.
शो दरम्यान युझवेंद्र चहलने माजी ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर अँड्र्यू सायमंडसोबतच्या जवळच्या नात्याबाबत माहिती दिली. चहल म्हणाला, मी आणि अँड्र्यू सायमंड्सने मुंबईकडून एकत्र खेळताना बराच काळ एकत्र घालवलाय. २०११मध्ये आम्ही दोघे जवळ आलो होतो. मी मुंबईकडून पदार्पण केले होते आणि सायमंड्स संघात होता. माझी रुम त्यांच्या रुमच्या जवचळच होती. एक दिवस तो माझ्या रुममध्ये आला आणि त्याने बोलण्यास सुरुवात केली. पुढच्याच दिवशी त्याने माझा नंबर घेतला. यानंतर आमचे फोनवर बोलणे सुरु झाले.
चहल पुढे म्हणाला, माझ्यात आणि सायमंड्स यांच्याच चांगले नाते निर्माण झाले होते. सायमंड्स आणि त्याची पत्नी आजही माझ्या संपर्कात आहेत. दोघेही मला अॅपल अशी हाक मारतात. युझवेंद्रच्या हल्क्या बायसेप्सवरुन त्याला हे नाव देण्यात आलंय. जेव्हाही चहल ऑस्ट्रेलियाला जातो तेव्हा सायमंड्सची पत्नी त्याला जरुर बटर चिकन खाऊ घालते