बांग्लादेशला नमवल्यानंतर विराट कोहली म्हणतो...

विराट कोहलीने बांग्लादेशविरूद्ध उपांत्य फेरीत ९६ धावा करुन भारताला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली

Updated: Jun 17, 2017, 02:31 PM IST
बांग्लादेशला नमवल्यानंतर विराट कोहली म्हणतो...  title=

लंडन : विराट कोहलीने बांग्लादेशविरूद्ध उपांत्य फेरीत ९६ धावा करुन भारताला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली. विजयानंतर फायनलमध्ये पोहचणाऱ्या टीमच्या कॅप्टन विराटनं आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आयपीएलनंतर केलेली तयारी या स्पर्धेत फायदेशीर ठरली' असं विराटनं यावेळी म्हटलंय. 

कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये ८,००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. गरज लागेल तेव्हा कोहलीने स्वत: जबाबदारी घेतली आहे तसंच इतरांनाही बिनधास्तपणे खेळण्याची संधीही त्यानं दिलीय. 
 
कोहलीला त्याच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना, 'मी माझ्या बॅटींगवर पूर्णपणे समाधानी आहे पण, सध्या मी किती धावा करत आहे याचा काहीच फरक पडत नाही...' असं म्हटलंय. या विजयानंतर आता टीम इंडियाचं लक्ष लागलंय ते फायनलकडे आणि पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याकडे...