वेस्ट इंडिजविरूद्धच्या मॅचमध्ये पॅट कमिन्सचं द्विशतक, केला अनोखा विक्रम!

सुपरफास्ट पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा ठरला 5 वा गोलंदाज!

Updated: Dec 2, 2022, 05:31 PM IST
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मॅचमध्ये पॅट कमिन्सचं द्विशतक, केला अनोखा विक्रम! title=

Pat Cummins Record : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमधील (AusvsWI Test Match) दोन सामन्यांच्या कसोटी मालिका चालू आहे. पर्थमध्ये (Perth) सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करताना ऑस्ट्रेलियाने 4 बाद 589 धावांवर पहिला डाव घोषित केला. तर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला कॅरेबिअन संघ अवघ्या 283 धावांवर गारद झाला. कर्णधार पॅट (Captain Pat Cummins) कमिन्सने पहिल्या डावात 3 विकेट्स घेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Captain Pat Cummins completed 200 Test wickets latets marathi sport news)
 
पॅट कमिन्सने कसोटीमध्ये वैयक्तिक 200 बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला बोल्ड आऊट करत  त्याने आपल्या 200 विकेट्स  घेतल्या आहेत. अवघ्या 44 कसोटी सामन्यांमध्ये सर्वात वेगाने 200 बळी घेणारा  कमिन्स पाचवा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद 200 बळी घेण्याचा विक्रम क्लेरी ग्रिमेटच्या (Clarrie Grimmett) नावावर आहे. ज्यांनी केवळ 36 कसोटींमध्ये हा पराक्रम केला. यानंतर डेनिस लिली (38) (Dennis Lillee), स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill) (41) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांनी 42 कसोटीत ही कामगिरी केली. या यादीतील डेनिस  लिली आणि कमिन्स हे दोघेच फास्टर आहेत.  

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांंदा बॅटींग करताना 589 धावा केल्या. यामध्ये मार्नस लाबूशेन आणि स्टीव स्मिथ यांनी द्विशतकी खेळी केली. तर ट्राविस हेड 99 धावांवर बाद झाला आणि त्याचं 1 धावेनं शतक हुकलं.