मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 12 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. टेस्ट सिरीजमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला वनडे सिरीजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय न्यूझीलंड दौऱ्यात देखील वनडे आणि टी-20 सिरीजमध्ये बुमराह खेळणार नाही. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी संघात मोहम्मद सिराजला स्थान देण्यात आलं आहे. बीसीसीआयने म्हटलं की, "मोहम्मद सिराजला जसप्रीतच्या जागी संघात घेण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सिरीज आणि न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी20 सामन्यात तो खेळणार नाही. सिद्धार्थ कौलला देखील न्यूझीलंड विरुद्ध 3 टी-20 सामन्यांसाठी संघात घेतलं आहे."
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये बुमराहने ४ टेस्टमध्ये शानदार कामगिरी करत २१ विकेट घेतल्या. बुमराहच्य़ा बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज टीकू शकले नाहीत. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने बुमराहचं कौतुक करत म्हटलं की, तो सध्याचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे.
12 जानेवारी 2019 - पहिली वनडे (सिडनी)- सकाळी 7:50 वाजता
15 जानेवारी 2019- दुसरी वनडे (एडिलेड)- सकाळी 8:50 वाजता
18 जानेवारी 2019- तीसरी वनडे (मेलबर्न)- सकाळी 7:50 वाजता
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, सिद्धार्थ कौल.