सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं २-१नं ऐतिहासिक विजय मिळवला. ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकता आली. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची टी-२० सीरिजनं सुरुवात झाली होती. ३ टी-२० मॅचची ही सीरिज १-१नं बरोबरीत सुटली होती, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती. टी-२० आणि टेस्ट सीरिजनंतर आता भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. फक्त ६ महिन्यांवर आलेल्या वर्ल्ड कपमुळे ही सीरिज म्हणजे भारताची वर्ल्ड कपआधीची परीक्षा असल्याचं बोललं जातंय. वर्ल्ड कपआधी भारत फक्त ११ मॅच खेळणार आहे. यातल्या ८ मॅच वनडे तर ३ मॅच टी-२० आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज १२ जानेवारीपासून सुरु होईल. यानंतर ऍडलेडमध्ये दुसरी वनडे १५ जानेवारीला आणि तिसरी वनडे १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये होईल.
पहिली वनडे- १२ जानेवारी, सिडनी- भारतीय वेळेनुसार सकाळी ८.५० वाजता
दुसरी वनडे- १५ जानेवारी, ऍडलेड- भारतीय वेळेनुसार सकाळी ९.२० वाजता
तिसरी वनडे- १८ जानेवारी, मेलबर्न- भारतीय वेळेनुसार सकाळी ८.५० वाजता
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलियाचा दौरा संपवल्यानंतर भारत लगेचच न्यूझीलंडला रवाना होईल. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारत ५ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज खेळेल. २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान वनडे सीरिज खेळवली जाईल. तर ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० मॅच खेळवण्यात येतील.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद