काय सांगता! अवघ्या 2 धावांत ऑलआऊट, क्रिकेट इतिहासातला सर्वात लाजीरवाणा पराभव

ज्या दोन धावा मिळाल्या त्याही होत्या अतिरिक्त

Updated: Jun 22, 2021, 05:51 PM IST
काय सांगता! अवघ्या 2 धावांत ऑलआऊट, क्रिकेट इतिहासातला सर्वात लाजीरवाणा पराभव title=

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम रचले जातात, अनेक विक्रम मोडले जाता. काही वेळा तर विचारही करु शकत नाही अशा गोष्टीही घडत असतात. अशीच काहीशी एक घटना काऊंटी क्रिकेटमध्ये बघायला मिळाली. एका सामन्यात पूर्ण संघ अवघ्या 2 धावांवर ऑलआऊट झाला.

क्रिकेटच्या इतिहासातली कदाचित अशी पहिलीच घटना आहे. बकडन क्रिकेट क्लब आणि फाल्कन्स हंटिंगडनशायर या दोन संघांमध्ये काऊंटी सामना खेळवला गेला. पहिली फलंदाजी करताना फाल्सन्स संघाने 261 धावांचं आव्हान ठेवलं

258 धावांनी झाला पराभव
पण विजयाचं आव्हान समोर ठेऊन मैदानात उतलेल्या बकडन संघाचा एकही फलंदाज मैदानावर टीकू शकला नाही. विशेष म्हणजे एकाही फलंदाजाला धावांचं खातं उघडता आलं नाही. ज्या दोन धावा मिळाल्या त्यात एक वाईड आणि बाय धावांचा समावेश आहे. या दोन अतिरिक्त धावाही मिळाल्या नसत्या तर शुन्यावर बाद होण्याची नामुष्की संघावर ओढावली असती.