'बबल फूटबॉल'चादेखील रंगणार वर्ल्डकप

  'बबल' फूटबॉल' हा खेळ आतापर्यंत केवळ मजेचा भाग म्हणून खेळला जात असे.

Updated: Oct 25, 2017, 03:22 PM IST
'बबल फूटबॉल'चादेखील रंगणार वर्ल्डकप  title=

 मुंबई :  'बबल' फूटबॉल' हा खेळ आतापर्यंत केवळ मजेचा भाग म्हणून खेळला जात असे.

पण येत्या काही दिवसांमध्ये या खेळाचादेखिल वर्ल्डकप खेळला जाणार आहे. नॉर्वेमध्ये हेनरिक एल्वेस्टेड-जोहान गोल्डन वर्ष 2014 मध्ये एका टीव्ही शो दरम्यान हा खेळ रसिकांच्या भेटीला आला. त्यानंतर या खेळाची लोकप्रियता वाढली. 

 पाश्चात्य देशांमध्ये या खेळाची लोकाप्रियता इतकी वाढली की आता या खेळासाठी विश्वकप सामनेदेखील रंगणार आहेत. पुढील वर्षी लंडनमध्ये पहिल्या बबल फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. मे महिन्यामध्ये हे सामने रंगणार आहेत.  

 कोणते संघ होणार सहभागी ? 
पहिल्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड, ब्राझील, जर्मनी,स्कॉटलंड, आयर्नलंड, दक्षिण अफ्रिका, फिनलॅन्ड सहित १६ संघा या वर्ल्डकपमध्ये सहभाग घेणार आहेत. या टुर्नामेंटला अजुनही फीफाकडून मान्यता मिळालेली नाही. या टुर्नामेंट द्वारा बबल फुटबॉलला ग्लोबल प्रमोट करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. एका रिसर्चच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये सुमारे ५५,००० लोकं हा खेळ खेळतात. अमेरिकेतही 3 वर्षामध्ये ३९ लीग तयार झाले आहेत. 

 कसा खेळतात खेळ ? 
मॅचमध्ये ५-५ मिनिटांच्या दोन हाफ खेळले जातात. प्रत्येक टीममध्ये ५-५  खेळाडू असतात. सोबत ३ सब्स्टिट्युट असतात. हाताचा वापर न करता शरीराच्या इतर कोणत्याही भागाचा वापर करून गोल करता येऊ शकतो. या खेळामध्ये गोलकीपर नसतो. पाचपैकी एक खेळाडू गोल वाचवण्याचा प्रयत्न करतो. चूक झाल्यास खेळाडूला दोन मिनिटांसाठी सस्पेंड केले जाते.