IND vs AFG : आधी फोर मग सिक्स! पेटलेल्या हार्दिक पांड्याने थेट उडवला तिसरा डोळा; पाहा Video

Hardik Pandya Viral Video : रोहितने हार्दिक पांड्या अन् जडेजाला बॉलिंगला लावलं. मात्र, दोघांना हटके पडत होते. त्याचवेळी हार्दिकने टप्प्यात गोलंदाजी करत उमरझाई (Wicket of Azmatullah Omarzai) याचे स्टंप्स उडवले.

Updated: Oct 11, 2023, 06:29 PM IST
IND vs AFG : आधी फोर मग सिक्स! पेटलेल्या हार्दिक पांड्याने थेट उडवला तिसरा डोळा; पाहा Video title=
Hardik Pandya, IND vs AFG

Hardik Pandya, IND vs AFG : क्रिकेट वर्ल्ड कपचा 9 वा सामना भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 272 धावांचा डोंगर उभा केला. अफगाणिस्तानने भारतासमोर कडवी झुंज दिली. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलं होतं. या सामन्यात बुमराहने 4 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या तर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 2 गडी बाद करत अफगाणिस्तानची पार्टनरशीप फोडून काढली होती. हशमतुल्लाह शाहीदी आणि अजमातुल्ला उमरझाई (Azmatullah Omarzai) यांच्यातील 121 धावांची भागेदारी पांड्याने फोडली. त्यावेळी त्याने भन्नाट सेलिब्रेशन केलं. 

अफगाणिस्तानच्या डावातील 13 व्या ओव्हरपर्यंत 3 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या फक्त 63 धावा होत्या. त्यावेळी हशमतुल्लाह शाहीदी आणि अजमातुल्ला उमरझाई यांनी डाव सांभाळला अन् 100 धावांची पार्टनरशिप पूर्ण केली. त्यानंतर रोहित शर्माचं टेन्शन वाढलं. रोहितने आपला हुकमी एक्का बाहेर काढला. हार्दिक पांड्या अन् जडेजाला बॉलिंगला लावलं. मात्र, दोघांना हटके पडत होते. त्याचवेळी हार्दिकने टप्प्यात गोलंदाजी करत उमरझाई याचे स्टंप्स उडवले. त्यावेळी त्याने बेल्स म्हणजे स्टंप्सचा तिसरा डोळा उडवला. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, सामन्यापूर्वी बर्थडे बॉय हार्दिक पांड्याने ४० हजारांहून अधिक लोकांसमोर केक कापला. यामुळे हार्दिकचा बर्थडे अधिकच खास होता.  मला सकाळी आणि काल रात्री झोपण्यापूर्वी खूप शुभेच्छा मिळाल्या आहेत. मात्र, आम्ही आता सामन्यावर फोकस करतोय, असं हार्दिक यावेळी म्हणाला आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.