बर्ड डे स्पेशल : टीम इंडियाचा पहिला कर्णधार, ६७ वर्ष खेळला क्रिकेट

 क्रिकेट विश्वात अलिकडे खेळाडूंचं वय ३० झालं की, निवॄत्तीची चर्चा व्हायला लागते. पण टीम इंडियाचा एक खेळाडू असाही होता ज्याने वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत निवॄत्ती घेतली नव्हती. 

Updated: Oct 31, 2017, 01:36 PM IST
बर्ड डे स्पेशल : टीम इंडियाचा पहिला कर्णधार, ६७ वर्ष खेळला क्रिकेट title=

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात अलिकडे खेळाडूंचं वय ३० झालं की, निवॄत्तीची चर्चा व्हायला लागते. पण टीम इंडियाचा एक खेळाडू असाही होता ज्याने वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत निवॄत्ती घेतली नव्हती. 

त्यांचं नाव कदाचित करोडों क्रिकेट चाहत्यांपैकी काहीच लोकांना माहिती असेल. ते नावं होतं कर्नल सीके नायडू. सीके नायडू यांनाच टीम इंडियाचा पहिला कर्णधार होण्याचा मान मिळाला होता. म्हणजे जी विरासत आज धोनी आणि विराट सांभाळत आहेत त्याचा पाया कर्नल सीके नायडू यांनी रचला होता. ३१ ऑक्टोबर १८९५ मध्ये नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 

महत्वाची बाब म्हणजे ज्या वयात खेळाडू निवॄत्ती घेतात, त्या वयात कर्नल सीके नायडू यांना टेस्ट टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. इंग्लंड विरूद्ध जून १९३२ मध्ये जेव्हा त्यांनी पहिला टेस्ट सामना खेळला तेव्हा ते ३७ वर्षांचे होते. त्यांनी टीम इंडियासाठी एकूण ७ टेस्ट सामने खेळलेत. पण इतके खेळून ते थांबले असे नाही तर ते त्यांच्या करिअरमध्ये एकूण २०७ फर्स्ट क्लास सामने खेळले.  

कर्नल सीके नायडू यांनी त्यांचा शेवटचा फर्स्ट क्लास सामना ६७ व्या वर्षी खेळला. सात टेस्ट सामन्यांमध्ये त्यांनी दोन अर्धशतकांच्या मदतीने ३५० रन्स केले. नायडू फास्ट बॉलिंगही करायचे. त्यांनी ७ सामन्यांमध्ये ९ विकेट घेतल्या. 

अपघाताने मिळाली कर्णधारपदाची संधी

कर्नल यांचं पूर्ण नाव कोट्टारी कनकैया नायडू होते. टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना संयोगानेच मिळाली. १९३२ मध्ये टीम इंडियाची जबाबदारी पोरबंदरच्या महाराजांच्या हाती होती. पण शेवटच्या क्षणी त्यांची तब्येत बिघडली आणि ते जाऊ शकले नाही. त्यामुळे टीमचं नेतृत्व करण्याची संधी कर्नल सीके नायडू यांच्याकडे आली. 

अफाट लोकप्रियता

सीके नायडू यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर भलेही जास्त काळ चाललं नाही. पण त्यांनी फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये आपल्या खेळाने अफाट लोकप्रियता मिळवली होती. १९२६-२७ मध्ये त्यांनी मुंबईत १०० १८७ बॉल्समध्ये १५३ रन्सची खेळी केली होती. या खेळीत त्यांनी ११ सिक्सर लगावले होते. यातील एक सिक्सर तर जिमखान्याच्या छतावर गेला होता. या सामन्यानंतर त्यांना चांदीची बॅट गिफ्ट करण्यात आली होती.