मिताली राजचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दिसणार

भारतीय महिला टीमची कॅप्टन मिताली राजचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Sep 26, 2017, 04:22 PM IST
मिताली राजचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दिसणार title=

मुंबई : भारतीय महिला टीमची कॅप्टन मिताली राजचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वायकॉम १८ मोशन पिक्चर्सनं याबाबतची घोषणा केली आहे. वायकॉम १८ मोशन पिक्चर्सला मिताली राजचा बायोपिक बनवण्याचे अधिकार मिळाले आहेत. वायकॉम १८ मोशन पिक्चर्सनं याआधी क्वीन, मांझी, द माऊंट बॅटन, भाग मिल्खा भाग, मेरी कॉम आणि टॉयलेट एक प्रेम कथा यासारखे हिट चित्रपट बनवले आहेत.

या चित्रपटामध्ये मितालीच्या भूमिकेमध्ये कोण असणार याचा निर्णय अजूनही झालेला नाही. याआधी धोनी, सचिन, अजहर या क्रिकेटपटूंचा बायोपिक प्रदर्शित झाला होता. तर लवकरच कपील देव यांचाही बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कपील देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंग असणार आहे.

मिताली राज महिलांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणारी खेळाडू आहे. मितालीनं वनडेमध्ये ६ हजार रन्स पूर्ण केल्या आहेत. २००५ आणि २०१७ या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये मितालीच्याच नेतृत्वात भारत फायनलमध्ये पोहोचला होता. मिताली राजला २०१५ मध्ये भारतातला चौथा सर्वोत्तम नागरी पुरस्कार पद्मश्री देण्यात आला होता.