World Cup: अफगानिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; 'या' 4 टीम गाठणार सेमीफायनल

World Cup 2023 Updated Points Table: पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तानने श्रीलंकेच्या टीमचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. यावेळी अफगाणिस्तान टीमच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झालाय.

सुरभि जगदीश | Updated: Oct 31, 2023, 11:46 AM IST
World Cup: अफगानिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; 'या' 4 टीम गाठणार सेमीफायनल title=

World Cup 2023 Updated Points Table: सोमवारी अफगाणिस्तानच्या टीमने पुन्हा एकदा मोठा उलटफेर करून दाखवला. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तानने श्रीलंकेच्या टीमचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. यावेळी अफगाणिस्तान टीमच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झालाय. अफगाणिस्तानची टीम 6 पॉईंट्सच्या जोरावर पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान यामुळे पाकिस्तानच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

अफगाणिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

अफगाणिस्तानकडून श्रीलंकेला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. टॉस जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि श्रीलंकेचा डाव 49.3 मध्ये 241 रन्सवर आटोपला. श्रीलंकेकडून पथुम निसांका सर्वाधिक म्हणजेच 46 रन्स केले. अफगाणिस्तानच्या टीमने 8 विकेट्स पटकावले तर 2 रन आऊट झाले. 

अफगाणिस्तानच्या टीमच्या खेळाडूंची तुफान फलंदाजी

श्रीलंकेने दिलेल्या 242 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान टीमनच्या फलंदाजांनी सहज विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून रहमत शाह 62 आणि इब्राहिम झद्रान 39 रन्स करत यांनी चांगली फलंदाजी केली. हशमतुल्ला शाहिदी आणि अझमतुल्ला उमरझाई यांच्या नाबाद पार्टनरशिपने टीमला वर्ल्डकपमधील तिसरा विजय मिळवून दिला.

कोण पोहोचणार सेमीफायनलमध्ये

या विजयासह अफगाणिस्तानची टीम अजूनही टॉप-4 मध्ये जाण्याच्या शर्यतीत आहे. या टीमचे 6 सामन्यात 3 विजयासह 6 पॉईंट्स झाले आहेत. या सहा पॉईंट्सवर सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या टीमला सेमीफायनल गाठणं इतकं सोपं नाही. टीमला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील, त्यानंतरच टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळणार आहे. श्रीलंकेवरील विजयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या सेमीफायनल गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जातायत.

अफगाणिस्तानच्या टीमने पाकिस्तानला मोठा धक्का

अफगाणिस्तानच्या विजयानंतर पाकिस्तानला जोरदार झटका बसलाय. यामुळे पाकिस्तानची टॉप-4 मध्ये जाण्याची शक्यता नगण्य आहे. परंतु पाकिस्तान टॉप-4मध्ये पोहोचू शकत नाही, असं नाहीये. पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी मोठा चमत्कार घडावा लागू शकतो. पाकिस्तानचे आतापर्यंत 6 सामन्यांत 4 पॉईंट्स झाले आहेत. टॉप-4च्या शर्यतीत राहण्यासाठी टीमला आगामी सर्व सामने जिंकावे लागतील. असे असूनही अफगाण टीमने आपले सर्व सामने जिंकल्यास पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडेल.