Watch: कर्णधार म्हणून सूर्यकुमारने उचललं मोठं पाऊल; विजयानंतर 'यांच्या' हातात सोपवली ट्रॉफी

IND vs AUS, 5th T20I: शेवटचा म्हणजेच पाचवा सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका कृत्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 5, 2023, 09:04 AM IST
Watch: कर्णधार म्हणून सूर्यकुमारने उचललं मोठं पाऊल; विजयानंतर 'यांच्या' हातात सोपवली ट्रॉफी title=

IND vs AUS, 5th T20I: वर्ल्डकपनंतर टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 सिरीज खेळवली गेली. या सिरीजमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 4-1 असा विजय मिळवला. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादववर देण्यात आली होती. अशात शेवटचा म्हणजेच पाचवा सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका कृत्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. 

टीम इंडियाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात 6 रन्सने विजय मिळवला. यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 सिरीज 4-1 ने जिंकली. सिरीज जिंकल्यानंतर सूर्याकुमारने विजेती ट्रॉफी ज्या खेळाडूंच्या हाती दिली त्यामुळे त्याचं कौतुक होताना दिसतंय.

सूर्याने सिरीज जिंकताच दाखवलं मोठं मन

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सिरीज जिंकल्यानंतर चाहत्यांची मनं देखील जिंकून घेतली. टी-20 सिरीज जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली. यानंतर फोटो सेशनच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने युवा खेळाडू रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांच्याकडे टी-20 सिरीजच्या विजेत्याची ट्रॉफी सुपूर्द केली.

BCCI ने शेयर केला सूर्याचा खास Video

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) सोशल मीडिया हँडलवर टीम इंडियाने सिरीज जिंकल्यानंतरचा अद्भुत आणि संस्मरणीय क्षणाचा व्हिडिओ शेअर केलाय. यावेळी सूर्याचं हे कृत्य कॅमेरात कैद झालं. कर्णधार सूर्यकुमार यादवने रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांना ट्रॉफी दिली तेव्हा दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहण्यासारखा होता.

सिरीजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय

श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि मुकेश कुमारच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 रन्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने सिरीज देखील 4-1 ने जिंकली. चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाने आठ विकेट्स गमावून 160 रन्स केले. तर कागांरूना प्रत्युत्तरात 154 रन्सपर्यंत मजल मारता आली. अखेर 6 रन्सने टीम इंडियाचा विजय झाला.