धोनीच्या बॅटींगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर भडकला भुवनेश्वर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज तिरुवनंतपूरम येथे खेळला जाईल. त्याआधी, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने महेंद्रसिंग धोनीला लेजेंड म्हटलं आहे.

Updated: Nov 7, 2017, 12:27 PM IST
धोनीच्या बॅटींगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर भडकला भुवनेश्वर title=

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज तिरुवनंतपूरम येथे खेळला जाईल. त्याआधी, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने महेंद्रसिंग धोनीला लेजेंड म्हटलं आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने 40 धावांनी पराभव केला होता. धोनीने सामन्यात 49 रन केले पण त्यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. 

सोमवारी सराव सत्रानंतर धोनीला आता संघात ठेवावं की नाही या प्रश्नावर उत्तर दिलं. 'धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी त्याचे रेकॉर्ड आधी पाहावे. आमच्या संघामध्ये धोनीच्या खेळाबद्दल कोणालाही काहीही शंका नाही.'

याआधी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने म्हटलं होतं की, 'काय आता धोनीने टी-20 मध्ये खेळावं?' यानंतर व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने देखील असं वक्तव्य केलं होतं की, 'धोनीने आता नव्या युवकांना संघात स्थान द्यावे.'