नवी दिल्ली : पहिल्या टी २० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला. भुवनेश्वर कुमार या विजयाचा शिल्पकार ठरला होता.
४ ओव्हरमध्ये १० डॉट बॉल टाकत त्याने केवळ २४ रन्स दिले.
जेव्हा दक्षिण आफ्रिका जिंकण्यासाठी लढत होती त्यावेळी त्याने एका ओव्हरमध्ये ३ विकेट घेतल्या. ती भुवीची शेवटची ओव्हर होती.
'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार भुवीला देण्यात आला. पहिली इनिंग संपल्यानंतर त्याने आणि टीमने मिळून आखलेल्या स्ट्रॅटर्जीबद्दल भुवीने सांगितले.
साऊथ आफ्रिकेच्या बॉलिंग बघून मैदानाचा अंदाज आला. आफ्रिकन फास्ट बॉलर्सची धुलाई झाल्यानंतर एक लक्षात आलं की फास्ट बॉल टाकण योग्य नसेल.
जेवढा जास्त फास्ट बॉल टाकू तेवढा चांगला बॅटवर येईल. यामुळेच रोहित, धवन, कोहली, रैना सर्वांनी शानदार हिटींग केली.
बॉलचा स्पीड कमी करायची योजना टीमने बनविली. जास्त जोरात फोकण्याचा प्रयत्न करायचा नाही.
याचाच परिणाम म्हणून भुवीला ५ विकेट्स मिळाल्या.
आपली स्ट्रॅटर्जी यशस्वी झाल्याचा आनंद भुवीने व्यक्त केला.
फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेट घेण्यासाठी नवनव्या योजना आखणं गरजेच असल्याचेही भुवीने यावेळी सांगितलं.