IPL 2020: लवकरच राजस्थान संघात परतेल हा जगातील टॉप ऑलराऊंडर

जगातील टॉप ऑलराउंडर

Updated: Oct 3, 2020, 06:52 PM IST
IPL 2020: लवकरच राजस्थान संघात परतेल हा जगातील टॉप ऑलराऊंडर title=

दुबई : जगातील टॉप ऑलराउंडर्सपैकी एक बेन स्टॉक्स लवकरच राजस्थानच्या टीममध्ये दिसणार आहे. यूएईमध्ये तो रविवारी दाखल होणार असून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो मैदानावर उतरेल. स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने तो न्यूझीलंडमध्ये आहे. त्यामुळे सया 29 वर्षांच्या खिलाडीवर पाकिस्तानने इंग्लध्या तो आयपीएलमधून दूर आहे.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सीरीज मध्येच सोडून तो वडिलांच्या देखभालीसाठी निघून गेला होता. त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी तो क्राइस्टचर्च येथे आला होता.

राजस्थान रॉयल्सचा हा खेळाडू रविवारी यूएईमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. फ्रेंचाइजीने स्टोक्सचा फोटो शेअर केला आहे.

स्टोक्सला राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटींना विकत घेतलं होतं. इंग्लंडला 2019 मध्ये वनडे वर्ल्ड कप चॅम्पियन बनवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याने आतापर्यंत 67 टेस्ट, 95 वनडे आणि 26 टी-20 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.