Ben Stokes च्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पाकिस्तानी पत्रकाराने उडवली कमांडर अभिनंदन यांची खिल्ली? Video Viral

पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची रोमांचक सिरीज खेळवली जातेय. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्व भारतीय संतापले आहेत.

Updated: Dec 6, 2022, 06:51 PM IST
Ben Stokes च्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पाकिस्तानी पत्रकाराने उडवली कमांडर अभिनंदन यांची खिल्ली? Video Viral title=

Ben Stokes: पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची रोमांचक सिरीज खेळवली जातेय. यामध्ये पहिला सामना रावळपिंडीमध्ये (Pakistan vs England 1st Test) खेळवण्यात आला. ज्यामध्ये बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. 74 रन्सने पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं. ही टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वात रंजक सामना मानला गेला. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्व भारतीय संतापले आहेत.

Ben Stokes च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उडवली अभिनंदनची खिल्ली

रावळपिंडी टेस्टनंतर Ben Stokes ची प्रेस कॉन्फरन्स होती. यावेळी बेन स्टोक्सला एका पाकिस्तानी पत्रकाराने मजेत विचारलं, 'चाय कैसी थी (हाऊ वॉज़ द Tea)'. बेन स्ट्रोक्सला हा प्रश्न पहिल्यांदा कळला नसल्याने त्याने पुन्हा एकदा विचारला आणि उत्तर काय द्यायचं, याबाबत विचार केला. याचवेळी पाकिस्तानी पत्रकार स्वतःच म्हणाला की, द टी इज फँटास्टिक.

मुख्य म्हणजे बेन स्टोक्स (Ben Stokes)ला काहीही कल्पना नव्हती की, हा प्रश्न म्हणजे भारतीय वायुसेना विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवली जातेय. द टी इज फँटास्टिक, असं पत्रकाराने म्हटल्यानंतर स्टोक्सही चहाची तारीफ करू लागतो.

पाकिस्तानी जमिनीवर पडले होते अभिनंदन

अभिनंदन हेच ​​तेच आहेत ज्यांनी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर F-16 लढाऊ विमान आपल्या लढाऊ विमान Mig-21 Bison याने खाली पाडलं होतं. यादरम्यान ते पाकिस्तानच्या भूमीवरही पडले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना कैद केलं. त्यावेळी तब्बल 60 तासांनंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली होती. 

दरम्यान त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता, ज्यामध्ये अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांना चहा देण्यात आला होता. यावेळी त्यांना चहा कसा आहे, असा प्रश्न करण्यात आला होता.  

पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजचा (PAK vs ENG, 1st Test) पहिला सामना रावलपिंडी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने यजमान पाकिस्तानचा 74 धावांनी धुव्वा (England Defeat Pakistan By 74 Runs) उडवला आहे. या सामन्यातील अखेरचा दिवस सर्वात थरारक राहिला. कॅप्टन बेन स्टोक्सने (Ben Stokes) मोठा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला त्यांच्याच जाळ्यात फसवलं.