ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याच एशेज सीरीज 2021ची सुरुवात फार धडाकेबाज सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा संघ 147 रन्समध्ये ऑलआऊट झाला आहे. तर पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विक्रमही झाला आहे. आतापर्यंत केवळ दोनदा केलेल्या या विक्रमाची 85 वर्षांनंतर पुनरावृत्ती झाली आहे. मात्र हे यश नसून लाजिरवाणं आहे. हा विक्रम इंग्लिश फलंदाज रॉरी बर्न्सच्या नावावर आहे.
अॅशेस मालिकेतील 85 वर्षांनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मालिकेतील पहिल्याच सामन्यात एखादा फलंदाज सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यापूर्वी हा लाजिरवाणा विक्रम 1936 मध्ये झाला होता. त्यानंतरही इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज एर्नी मॅककॉर्मिकने ही कामगिरी करून इंग्लंडचा सलामीवीर स्टॅन वर्थिंग्टनची विकेट घेतली होती.
WHAT A WAY TO START THE #ASHES! pic.twitter.com/XtaiJ3SKeV
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2021
ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून सर डॉन ब्रॅडमन यांची ही पहिलीच मालिका होती. मालिकेतील या पहिल्याच सामन्यात लज्जास्पद विक्रम करूनही इंग्लंडने विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 381 धावांचं लक्ष्य मिळालं, त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम 58 धावांवर गारद झाला. इंग्लंडने हा सामना 322 रन्सनी जिंकला. विशेष म्हणजे हा सामना ब्रिस्बेनमध्येही झाला होता.
आता 85 वर्षांनंतर ही कामगिरी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल स्टार्कने केली आहे. रॉरी बर्न्सला त्याचा स्विंग कळला नाही आणि तो क्लीन बोल्ड झाला. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटही खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तर डेव्हिड मलानने 6 आणि बेन स्टोक्सने अवघ्या 5 धावा केल्या. तब्बल 6 महिन्यांनंतर स्टोक्स क्रिकेटच्या मैदानात परतला आहे.