Corona विरुद्धच्या लढ्यात बीसीसीआयचा मदतीचा हात़

कोरोना संकटात बीसीसीआयकडून मदतीचा हात

Updated: May 24, 2021, 03:25 PM IST
Corona विरुद्धच्या लढ्यात बीसीसीआयचा मदतीचा हात़ title=

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोना साथीच्या आजवर सुरू असलेल्या युद्धामध्ये मदतीचा हा दिला आहे. बीसीसीआयने सोमवारी जाहीर केले की 10-लिटरच्या 2000 ऑक्सिजन कंसंट्रेटर मदत म्हणून देणार आहेत. देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, अनियंत्रित परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा कोसळली आहे. या वेळी लोकं रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सुविधांसाठी झगडताना दिसत आहेत.

पुढील काही महिन्यांत, बोर्ड गरजू रूग्णांना वैद्यकीय मदत आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर वितरित करेल आणि या उपक्रमामुळे साथीचा नाश कमी होण्यास मदत होईल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, "व्हायरसविरूद्ध दीर्घकाळ लढाई सुरू ठेवणार्‍या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल बीसीसीआय कौतुक करते. ते खरोखर योद्धे आहेत आणि आम्हाला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व त्यांनी केले आहेत. बोर्डाने नेहमीच आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे आणि ते यासाठी वचनबद्ध आहेत. ऑक्सिजन कंसंट्रेटर बाधित लोकांना त्वरित दिलासा देईल आणि त्यांना लवकरात लवकर बरे करेल.'

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, व्हायरसविरूद्धच्या या सामूहिक लढाईत आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत. बीसीसीआय या वैद्यकीय उपकरणांची नितांत आवश्यकता समजते. आशा आहे की या प्रयत्नामुळे देशभरात निर्माण झालेला तुटवडा भरुन काढण्यात मदत होईल. आपल्या सर्वांनी खूप त्रास सहन केला आहे. मी सर्वांना लस घेण्यासाठी आवाहन करतो.'

बीसीसीआयचे खजिनदार अरुणसिंग धूमल म्हणाले की, 'संकटाच्या वेळी क्रिकेट समुदाय नेहमीच पाठिंबा देण्यासाठी पुढे आला आहे. प्रत्येकजण एकत्र येऊन आपले कार्य करीत आहे हे पाहून आम्हाला आनंद होतो. बीसीसीआय सामाजिक उत्तरदायित्वाच्या दिशेने प्रयत्न करत आहे आणि व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नात त्यांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांशी नेहमीच सोबत कार्य करेल.'