मुंबई : BCCI अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन वेरिएंटचा धोका सर्वाधिक वाढला आहे. सौरव गांगुली देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. 49 वर्षांच्या सौरव गांगुलीला कोलकाताच्या वुडलँड्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे.
सोमवारी रात्री सौरव गांगुलीची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गांगुलीला पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. सौरव गांगुलीला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. असे असतानाही त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
देशात ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता गांगुलीला संसर्ग होणे ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता.
त्यानंतर त्याला काही दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सौरव गांगुलीला महिन्यातून दोनदा अँजिओप्लास्टी करावी लागली. मात्र, त्यानंतर तो बरा झाला आणि सतत काम करत होता.
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोना ओमायक्रॉनच्या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. भारतातही ओमायक्रॉनची ६०० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. तिसरी लाट येणार असल्याच तज्ज्ञांच मत आहे.