'जीएसटी'नंतर पहिल्याच आठवड्यात BCCI नं एवढा टॅक्स भरलाय...

जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा बोर्ड अर्थात बीसीसीआयनं आता कर चुकवण्याच्या बाबतीतही विक्रम केलाय. 

Updated: Sep 9, 2017, 09:11 PM IST
'जीएसटी'नंतर पहिल्याच आठवड्यात BCCI नं एवढा टॅक्स भरलाय... title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा बोर्ड अर्थात बीसीसीआयनं आता कर चुकवण्याच्या बाबतीतही विक्रम केलाय. 

केवळ एका आठवड्यात बीसीसीआयनं भरलेल्या कराची रक्कम तुमचे डोळ्यांची उघडझाप बंद करेल... 

केंद्र सरकारनं १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू केलाय. जीएसटी लागू केल्यानंतर बीसीसीआयनं ४४ लाख रुपये टॅक्स भरलाय. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दल माहिती देण्यात आलीय. जुलै महिन्यात बीसीसीआयनं ४४,२९,५७६ रुपये टॅक्स भरलाय. 

भारतीय टीमचा फिजिओ पॅट्रिक फरहार्ट याला पाच महिन्यांसाठी जवळपास ६० लाख रुपये देण्यात आलाय. काही खेळाडूंनाही २०१५-१६ सत्रासाठी आंतरराष्ट्रीय मॅचच्या एकूण महसूलातून काही भाग देण्यात आला. स्टुअर्ट बिन्नीला ९२ लाख रुपये आणि हरभजन सिंहला ६२ लाख रुपये देण्यात आले. तर स्पिनर अक्षर पटेलला जवळपास ३७ लाख आणि उमेश यादवला ३५ लाख रुपये मिळाले.