BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसणार? मोदी सरकारच्या एका निर्णयाने उडाली झोप!

पुढील वर्षी खेळला जाणारा ODI World Cup 2023 भारतात होणार आहे, त्याआधी BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 15, 2022, 01:07 AM IST
BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसणार? मोदी सरकारच्या एका निर्णयाने उडाली झोप! title=

2023 ODI World Cup: पुढील वर्षी खेळला जाणारा ODI World Cup भारतात होणार आहे. भारतात होणाऱ्या या एकदिवसीय विश्वचषकासाठी आयसीसीच्या प्रसारण करावर (tax surcharge) 21.84 टक्के अधिभार लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बीसीसीआयची (BCCI) झोप उडाल्याचं पहायला मिळतंय. लावण्याच्या भारत सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास बीसीसीआयला सुमारे 955 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं.

50 षटकांचा क्रिकेट विश्वचषक (2023 ODI World Cup) पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार, स्पर्धा आयोजित करण्यासाठी यजमान देशाला सरकारकडून करात सवलत घ्यावी लागते. भारताच्या कर नियमांमध्ये अशी सूट देण्याची तरतूद नाही.

2016 मध्ये टी-20 विश्वचषक आयोजित करतानाही बीसीसीआयला (BCCI) अशी सूट मिळाली नव्हती आणि 193 कोटी रुपयांचे नुकसान झालं. हे प्रकरण सध्या आयसीसी न्यायाधिकरणात प्रलंबित असल्याने बीसीसीआयच्या खिशाला कात्री लागणार आहे.

आणखी वाचा - Aus vs Eng : अरररर...काय ती शायनिंग! Ben stokes चा Video पाहून तुम्हीही पोटधरून हसाल

दरम्यान, कर अधिभार सध्याच्या 21.84 टक्क्यांवरून 10.92 टक्क्यांवर आणण्यासाठी बीसीसीआय चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. असं झाल्यास 430 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. 2016 ते 2023 या कालावधीत आयसीसीच्या महसुलात बीसीसीआयचा वाटा सुमारे 3336 कोटी रुपये आहे. 2023 मध्ये भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या प्रसारणातून आयसीसीला तब्बल 4400 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.