विरोधानंतर BCCIचं एक पाऊल मागे, या वर्षी IPL टायटल स्पॉन्सर नसेल VIVO कंपनी

भारत आणि चीन दरम्यान वाढता तणाव पाहता, चायनीज मोबाईल फोन कंपनी विवोसोबत आयपीएलच्या

Updated: Aug 6, 2020, 09:05 PM IST
विरोधानंतर BCCIचं एक पाऊल मागे, या वर्षी IPL टायटल स्पॉन्सर नसेल VIVO कंपनी title=

मुंबई : बीसीसीआयने भारत आणि चीन दरम्यान वाढता तणाव पाहता, चायनीज मोबाईल फोन कंपनी विवोसोबत आयपीएलच्या आगामी काळात जाहिरात तसेच प्रायोजकाचा करार कायम ठेवणार संकेत दिले आहेत. बीसीसीआयने अगदी एका ओळीत याविषयी माहिती देताना म्हटलं आहे. विवो या वर्षी आयपीएलसोबतच्या करारात नसणार आहे.

प्रेस रिलीजनुसार बीसीसीआय आणि विवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २०२० मध्ये इंडियन प्रिमिअर लीगसाठी कोणतीही पार्टनरशीप, जाहिरात-प्रायोजक करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवोने २०१८ ते २०२२ पर्यंत सलग ४ वर्ष २१९० कोटी रूपयांचा आयपीएल प्रयोजकाचा करार मिळवला होता.

बीबीसीआय आपल्या नियमानुसार नवीन सिझनसाठी टायटल प्रायोजक निवडणार आहे, ही निविदा प्रक्रिया काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएल १९ सप्टेंबर रोजी अरब अमिरातीत सुरू होणार आहे. 

भारतात कोविड-१९चा प्रभाव वाढल्याने परदेशात आयपीएलचं आयोजन करावं लागलं आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे अनेक कडक नियम बनवण्यात आले आहेत, या नियमांचं पालन खेळाडूंसह आयोजकांना करावं लागणार आहे.