कोच पदासाठी मी खूप महाग, BCCIला परवडणार नाही...

 चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुरू असताना टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भातील बातम्या येत आहे. नव्या कोचसाठी अर्ज दाखल झाले आहेत. भारतीय टीमच्या कोच पदावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशाच एक नवीन नाव समोर आले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 7, 2017, 07:20 PM IST
कोच पदासाठी मी खूप महाग, BCCIला परवडणार नाही... title=

नवी दिल्ली :  चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुरू असताना टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भातील बातम्या येत आहे. नव्या कोचसाठी अर्ज दाखल झाले आहेत. भारतीय टीमच्या कोच पदावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशाच एक नवीन नाव समोर आले आहे. 

हे नाव आहे ऑस्ट्रेलिया माजी दिग्गज लेग स्पीनर शेन वॉर्न याचे... पण टीम इंडियाच्या कोच पदावर शेन वॉर्नचे म्हणणे आहे की, तो खूप महाग आहे, त्यामुळे बीसीसीआयला मी परवडणारा नाही. 

मिड-डे या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत वॉर्न म्हणाला, मी खूप महाग आहे. त्यामुळे मला वाटते त्यांना ते परवडणारे नाही. विराट कोहली आणि माझ्या खूप चांगली मैत्री होऊ शकते. पण यासाठी माझी किंमत खूप आहे. शेन वॉर्न याने यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद आणि मेंटर म्हणून काम केले आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा कोच निवडण्यात येणार आहे. तसेच अनिल कुंबळे याचा कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो. पण या रेसमध्ये वीरेंद्र सेहवाग आता पुढे चालला आहे. सेहवागने केवळ दोन लाइनचा अर्ज बीसीसीआयला पाठवला आहे. पण बीसीसीआयने सेहवागकडून डिटेल सीव्ही मागितला आहे. 

शर्न वॉर्नचा जगातील अशा गोलंदाजांमध्ये समावेश होतो, ज्याने वन डे आणि टेस्ट मिळून १००० विकेट आपल्या नावावर केले आहेत. वॉर्नने १४५ टेस्ट सामन्यात २.२६ च्या इकॉनॉमिने ७०८ विकेट घेतल्या आहेत. तर १९४ वन डे सामन्यात ४.२५ च्या इकॉनॉमिने २९३ विकेट पटकावल्या आहेत.