Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून 'OUT'? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

BCCI Meeting:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज (21 डिसेंबर) एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार असून नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी खराब झाली होती. उपांत्य फेरीत संघाचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.

Updated: Dec 21, 2022, 08:47 AM IST
Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून 'OUT'? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय  title=
BCCI Apex Council Meeting LIVE Big DECISION DAY

BCCI Apex Council Meeting  :  टी-20 विश्वचषक 2022 पराभवानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) टी-20 मधील कर्णधारपद धोक्यात आले आहे. एक खेळाडू म्हणूनही त्याला गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामध्येच त्याला आता दुखापत झाली आहे. त्यानंतर आता एक गोष्ट अशी समोर आली आहे की, जी गेल्या 9 वर्षांत कधीच घडलेला नाही. रोहितसाठी ही सर्वात वाईट बातमी आलेली आहे. त्यातच आज (21 December) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच त्याच्या कर्णधाराबाबत मोठा निर्णय घेणार आहे. रोहित शर्माशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही (Rahul Dravid) टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. या दोन्ही खेळाडूंच्या भवितव्याबाबत सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत आज निर्णय घेतला जाणार आहे.   

दरम्यान टीम इंडियाला जानेवारीतच श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत टीम इंडिया (team India) नवा कर्णधार आणि प्रशिक्षक घेऊन मैदानात उतरू शकते. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20चा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याच वेळी, राहुल द्रविडवर कामाचा ताण कमी करण्यासाठी, त्याच्या जागी टी-20 संघात नवीन प्रशिक्षक येण्याची शक्यता आहे. 

वाचा : BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित - राहूल टी-20 संघातून OUT? 

इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्वोच्च परिषदेच्या सदस्याच्या बैठकीबद्दल सांगितले की, 'आम्हाला सारख सारख हरणे परवडणारे नाही. आता कोणतीही संधी जास्त देणार नाही. आधीच रोहित शर्माशी चर्चा करत आहोत आणि तो T20 फॉरमॅटसाठी नवीन कर्णधार नियुक्त करण्याबाबत सोयीस्कर आहे. राहुल द्रविडबाबतही आम्ही असेच करू. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.  

या बैठकीत हा मोठा मुद्दा असेल

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला भारतीय T20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवले जाऊ शकते. भारतीय संघाला पुढील मालिका श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळायची आहे. या मालिकेतूनच पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत बीसीसीआयच्या बैठकीत हा कर्णधार आणि प्रशिक्षकाचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय बीसीसीआयला नवीन निवड समितीही नेमायची आहे. अशा परिस्थितीत या बैठकीत मोठा निर्णयही होऊ शकतो. यासोबतच पुढील वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा नवा केंद्रीय करारही जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान नव्या केंद्रीय कराराच्या यादीतून कोण बाहेर जाऊ शकते आणि कोणत्या नव्या खेळाडूला त्यात स्थान मिळू शकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे 

स्प्लिट कोचिंग (T20 साठी)
स्प्लिट कॅप्टन्सी (हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्याची शक्यता)
T20 विश्वचषकचा रीव्यू
वर्तमान प्रशिक्षकांचे पुनरावलोकन
निवड समिती रोटेशन धोरण
केंद्रीय करार यादी