नवी दिल्ली : आयपीएलच्या वेगवेगळ्या टीममध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्सबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण या दिग्गज खेळाडूंना गरजेच्यावेळी मदत कोण करतं माहितेय का ? जेव्हा यांना आपल्या आवडीची बॅट ठिक करायची असते तेव्हा 'बॅटमॅन' मैदानात येऊन बॅट ठिक करतो. बॅटमॅन तर सुपरहिरो आहे मग मैदानात कसा येईल असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. असलम चौधरी असं या बॅटमॅनचं नाव आहे. मुंबईत राहणारे ६५ वर्षाचे असलम चौधरी बॅट बनविण्याण आणि दुरूस्त करण्याचं काम करतात. त्यांनी बनवलेल्या बॅटवर दोन बॉल आणि उडत्या पंखांचा स्टिकर असतो. त्यांच्या या कारनाम्यामुळे त्यांना बॅटमॅन म्हटलं जात. मी सचिन तेंडुलकर, फाफ डुप्लेसिस, स्टिव स्मिथ आणि ख्रिस गेल, महेंद्रसिंग धोनीसारख्या क्रिकेटर्सच्या बॅट ठिक केल्याचे असलम सांगतात.
क्रिकेटर्सचे प्रतिनिधी त्यांना फोन करतात. एकदा तर खुद्द विराट कोहलीने कॉल केला. 'मी विराट कोहली बोलतोय' असा समोरुन आवाज आला. काही वेळ मला विश्वासच बसला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत असलम यांचे 'अशरफ ब्रॉज' नावाने दुकान आहे. त्यांच्या वडिलांनी १९२० साली हे दुकान सुरू केलं. हळूहळू त्यांचे काम इतर वाढत गेल की देश आणि जगभरातील क्रिकेटर्स इथून बॅट दुरूस्त करुन घेऊ लागले. आयपीएल दरम्यान असलम यांच नाव खूप चर्चेत असत. कारण खूप बॅट्समन्सना त्यांची गरज असते. प्रत्येक बॅट्समन इथे संपूर्ण ताकद लावून फोर, सिक्स मारत असतो. अशावेळी बॅटवरही याचा परिणाम होत असतो. आयपीएलदरम्यान मला जास्त फोन येतात. मग मी क्रिकेटर्सच्या बॅट घेऊन येतोय असा मला फोन येतो. माझ्याकडे तेव्हा फार कमी वेळ असतो. कारण पुढच्या मॅचआधी बॅट्समनला बॅट देणं गरजेच असतं. मॅचसाठी त्यांना दुसऱ्या जागेवरही पोहोचायच असतं. असही असलम सांगतात.