शेतकरी पुत्र, युवा झहीर खान ओळख असणारा 'हा' खेळाडू आज कुठेच नाही!

ज्याला पाहून प्रत्येकाला झहीर खानची झलक दिसलेला हा खेळाडू नेमका कुठे झाला गायब!

Updated: Dec 29, 2022, 06:11 PM IST
शेतकरी पुत्र, युवा झहीर खान ओळख असणारा 'हा' खेळाडू आज कुठेच नाही!  title=

Indian Cricket Team : टीम इंडियामध्ये (Team India) स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकजण कसून मेहनत करतो. ज्यावेळी संघात खेळण्याची संधी मिळते तेव्हा स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यागत वाटतं. मात्र संघात स्थान मिळवल्यावर ते स्थान कायम टिकून ठेवणं हे सर्वांसमोर मोठं आव्हान असतं. अनेक प्रतिभावान खेळाडूंना त्यांचा फॉर्म कायम न ठेवता आल्याने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. भारतीय संघाची जर्सी घालून सामना खेळणं हे सप्न अगदी काहीच खेळाडूंचं पूर्ण होतं. काही खेळाडू तर असे आहेत की जे संघातून बाहेर पडल्यावर दिसलेच नाहीत, ना त्यांचं नावही कुठे परत ऐकायला मिळालं. असाच एक खेळाडू आहे ज्याला पाहून प्रत्येकाला झहीर खानची झलक त्याच्यामध्ये दिसली होती. 

नेमका कोण होता हा खेळाडू?
शेतकरी पुत्र असलेला हा खेळाडू ज्याने 2016 साली पदार्पण केलं आहे. साडेसहा वर्षापूर्वी ज्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्याची अवघ्या वर्षभरातच करिअर संपल्यात जमा झालं. त्याला परत भारतीय संघात खेळण्यासाठी संधी मिळाली नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बरिंदर सरन आहे. 

बरिंदर सरनची ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यासाठी निवड झाली होती. बरिंदर सरनने त्याआधी अवघे 8 लिस्ट-ए सामने खेळले होते. बरिंदरकडे स्पीड जास्त नव्हतं मात्र टीम इंडियाकडे डावखुरा गोलंदाज म्हणून त्याला संघात स्थान मिळालं होतं. बरिंदरसाठी भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंहने खास ट्विट केलं होतं. या युवा गोलंदाजाला पाहून झहीर खानची आठवण होत असल्याचं म्हटलं होतं.

भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सरनला 2015 साली राजस्थानच्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. एकदिवसीय बरिंदरने 6 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 2 टी-20 सामने खेळले, यामध्ये अनुक्रमे 7 आणि 6 विकेट्स घेतल्या.