वानखेडेवर रोहितचं वादळ, मुंबईचा धावांचा डोंगर

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं ६ विकेट गमावून २१३ रन्स केल्या आहेत.

Updated: Apr 17, 2018, 10:02 PM IST
वानखेडेवर रोहितचं वादळ, मुंबईचा धावांचा डोंगर  title=

मुंबई : बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं ६ विकेट गमावून २१३ रन्स केल्या आहेत. मॅचच्या पहिल्या दोन बॉललाच मुंबईला दोन धक्के बसले. उमेश यादवनं पहिल्या बॉलला सूर्यकुमार यादवला आणि दुसऱ्या बॉलला ईशान किशनला बोल्ड केलं. यानंतर रोहित शर्मा आणि एविन लुईसनं बंगळुरुच्या बॉलरची तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्मानं ५२ बॉलमध्ये ९४ रन केल्या. यामध्ये १० फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. एविन लुईसनं ४२ बॉलमध्ये ६५ रन केल्या. लुईसच्या खेळीमध्ये ६ फोर आणि ५ सिक्स होत्या. तळाला आलेल्या हार्दिक पांड्यानं ५ बॉलमध्ये नाबाद १७ रन केल्या. यामध्ये २ सिक्स आणि एका फोरचा समावेश होता.

बंगळुरूकडून उमेश यादव आणि कोरे अंडरसननं सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर क्रिस वोक्सला एक विकेट मिळाली. यंदाच्या मोसमात पहिल्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. त्यामुळे पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबईची टीम आतूर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये शून्य पॉईंट्ससह मुंबईची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे.