हॅमिल्टन : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या २३ ओव्हर झाल्या होत्या. यावेळी पाकिस्तानचा स्कोर दोन विकेट गमावत ९७ इतका होता.
पाच ओव्हरमध्ये ११ धावांमध्ये दोन विकेट गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ सावरला होता. यावेळी २४वी ओव्हर खेळण्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सने मिचेल सँटनरला बॉल दिला. यावेळी खेळपट्टीवर होता फखर जमान. त्याच्या ५४ धावा झाल्या होत्या.
सँटनरने फेकलेला पहिला बॉल फखरला समजलाट नाही. सँटनरने फेकलेला बॉल फखरच्या लेग स्टंपबाहेर गेला आणि अचानक ऑफ स्पिन होत जमान बोल्ड झाला. मिचेल सँटनरने टाकलेला हा बॉल पाहून कमेंटेटर्ससह सारेच अवाक झाले.
Just Wow!!!
Mitch Santner with yet another trick up his sleeve
via @BLACKCAPS pic.twitter.com/zZGeulSkFi— Abhay Chaudhary (@ImAbhay3) January 17, 2018
या प्रकारच्या बॉलला कॅरम बॉल म्हटले जाते. गोलंदाज आपल्या हाताच्या मधल्या बोटाचा वापर करुन बॉल टर्न करतो. या प्रकारची गोलंदाजी श्रीलंकेचा अजंथा मेंडिस आणि भारताचा आर. अश्विन करतो. या विकेटमुळे पाकिस्तानच्या हॅरिस सोहेल आणि जमान यांची ८६ धावांची भागीदारी तुटली. सँटनरच्या या बॉलमुळे कॉमेंटेटरही हैराण झाले. ऑफ स्पिनप्रमाणे टर्न होणारा कॅरम बॉल त्यांनी आतापर्यंत पाहिला नव्हता.