टी 20 वर्ल्ड कपआधी विराट आणि रोहितला या पाकिस्तानी क्रिकेटरपासून धोका

आयपीएल संपताच टी 20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Updated: Oct 1, 2021, 11:11 PM IST
टी 20 वर्ल्ड कपआधी विराट आणि रोहितला या पाकिस्तानी क्रिकेटरपासून धोका title=

मुंबई: आयपीएल संपताच टी 20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील होणार आहे. या टी 20 वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानच्या क्रिकेटपटूकडून टीम इंडियाच्या हिटमॅन रोहित शर्माला आणि किंग कोहली विराटला धोका आहे. 

पाकिस्तानचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज बाबर आझमने टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला टी 20 शतकांच्या बाबतीत मागे टाकले आहे. बाबर आझमच्या नावावर आता टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 6 शतके आहेत. तर विराट कोहलीने टी -20 मध्ये फक्त 5 शतके केली आहेत.

रोहित शर्मा आणि वॉटसन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शेन वॉट्सनचं नावही या यादीमध्ये आलं आहे. टी 20 मध्ये सर्वात जास्त शतक झळकवण्यात आशियातील फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि बाबर आझम पहिल्या स्थानावर आहेत. 

बाबर आझमने घरच्या मैदानावर खेळताना 63 चेंडूत 105 धावा केल्या होत्या. ज्यात त्याने 11 चौकार आणि 3 षटकारही मारले होते. त्याच्या टी -20 कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. पाकिस्तानचा फलंदाज अकमल आणि अहमद शहजादच्या नावावर टी -20 मध्ये 5-5 शतके आहेत. त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराट कोहलीची 315 टी -20 सामन्यांमध्ये 5 शतके आहेत. तर बाबर आझमच्या नावावर 194 टी -20 सामन्यांमध्ये 6 शतके आहेत.

टी 20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन्ही टीमसाठी सलामीचा सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये एकमेकांविरुद्ध खेळला जाणार आहे. त्यामुळे आता बाबर आझम पुन्हा शतक झळकवण्यासाठी तयारीला लागला आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी त्याचं शतक झळकवणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.