ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाचा आलियासोबत Hook Up गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलिया संघातील सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा आलियासोबत डान्स, पाहा व्हिडीओ

Updated: Jun 5, 2021, 07:43 AM IST
ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाचा आलियासोबत Hook Up गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सोशल मीडियावर तो वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळेच भारतात त्याचे फॅन फॉलोईंग कोट्यवधी आहे. 4 जून रोजी या फलंदाजाने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

आता चक्क डेव्हिड वॉर्नरने बॉलिवूडची स्टार आलिया भट्टसोबत डान्स केला आहे. हुक अप गाण्यावर वॉर्नर डान्स करताना दिसत आहे. डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने स्वत: ला रिफेस अॅपद्वारे टायगरच्या जागी आपला चेहरा बनवला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसोबत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' च्या 'हुक अप सॉन्ग' वर वॉर्नर आलियासोबत नाचताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by David Warner (@davidwarner31)

ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला तेलगुमध्ये प्रपोज केलं होतं. दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अभिनेत्यांसोबत डान्स करताना दिसला होता. त्याने याचे व्हिडीओ सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. चाहत्यांनी त्याला थलायवा असंही म्हटलं आहे. त्याचे हे व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडले आहेत. प्रत्येक व्हिडीओला जवळपास 16 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.