Ashes Series: ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर सहज विजय

ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

Updated: Dec 11, 2021, 11:41 AM IST
Ashes Series: ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर सहज विजय title=

मुंबई : अॅशेस मालिकेत ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लिश संघाचा 9 विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह कांगारू संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड काही विशेष कमागिरी करू शकला नाही. 

इंग्लंडचा दुसरा संपूर्ण संघ 297 रन्समध्ये बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ 20 धावांचं लक्ष्य मिळालं. ऑस्ट्रेलिया टीमनेही एक विकेट गमावत हे लक्ष पूर्ण केलं. अॅलेक्स कॅरी 9 धावा करून बाद झाला. कांगारू टीमने पहिल्या डावात 425 धावा केल्या. त्याचबरोबर इंग्लंडला पहिल्या डावात 147 रन्स तर दुसऱ्या डावात 297 रन्स करता आले.

रूट आणि मलान अपयशी

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार जो रूटने 86 रन्सवर तर डेव्हिन मलान 80 रन्सवर नाबाद परतले होते. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने दोन बाद 220 धावा केल्या. चौथ्या दिवशी रूट आणि मालन संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा होती. पण तसं होऊ शकलं नाही. 

तिसऱ्या दिवशी नाबाद फलंदाज जो रूटला त्याच्या धावसंख्येत केवळ 3 रन्सची भर घालता आली आणि तो 89 धावा करून आऊट झाला. त्याचवेळी डेव्हिड मलानला केवळ 2 रन्स करता आले आणि त्याने 82 धावा केल्या.

लियोनचे घेतले 4 विकेट्स

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज नॅथन लियोन ठरला. त्याने 4 विकेट्स पटकावले. त्याच्याशिवाय पॅट कमिन्सने 2, कॅमरून ग्रीनने 2 विकेट्स घेतले. याशिवाय मिचेल स्टार्क आणि जोस हेझलवूडला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.