Mitchell Starc Clean Bowled Video: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर आता कसोटी मालिका खेळण्यावर भर देण्यात येत आहे. अशातच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये (AUS vs WI) दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येत आहे. त्यातील पहिल्या सामन्यात (AUS vs WI 1st Test) ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. तर गोलंदाजांनी देखील वेस्ट इंडिज फंलदाजांचा घाम फोडलाय. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचल स्टार्कची (Mitchell Starc) एकच चर्चा होताना दिसत आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 598 धावा स्कोरबोर्डवर उभ्या केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ 283 धावांवर गारद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 182 केल्या आणि वेस्ट इंडिजला 498 धावांचं तगडं आव्हान दिलं. त्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजने 192 धावा केल्या आहेत. या सामन्याचा 5 वा दिवस अजून बाकी असून वेस्ट इंडिजच्या हातात 7 विकेट्स बाकी आहेत.
मिचेल स्टार्कने (Mitchell Starc Clean Bowled Video) घातक गोलंदाजी करत पहिल्या डावात 3 विकेट नावावर केल्या. तर दुसऱ्या डावात स्टार्कने 1 विकेट मिळवून दिलाय. पहिल्या कसोटी सामन्याच्या (AUS vs WI 1st Test) पहिल्या डावात स्टार्कने वेस्ट इंडिजचा विकेटकीपर फलंदाज जोशुआ दा सिल्वाची (joshua da silva) विकेट घेतली. त्याचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नव्या बॉलवर कमाल करत मिचेल स्टार्कने सिल्वाचं दांडकं उडवलं.
The death rattle! #AUSvWI pic.twitter.com/1UMdHA4gQ0
— cricket.com.au (@cricketcomau) December 2, 2022
दरम्यान, पहिल्यांदा इनस्विंग, नंतर आऊटस्विंग गोलंदाजी करत स्टार्कने सिल्वाला गोंधळात टाकलं आणि त्यानंतर एक शानदार इनस्विंग बॉलवर सिल्वाची विकेट काढली. बॉल एवढा परफेक्ट होता की, सिल्वाला देखील बॉल समजला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Austrelia) व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी स्टार्कचं कौतूक देखील केलंय.