Aus vs Sa : LIVE सामन्यादरम्यान क्रिकेटपटूने मैदानात मागवली सिगारेट, पाहा VIDEO

Australia vs South Africa, 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत (Australia vs South Africa) तीन सामन्यांची टेस्ट मालिका सुरू आहे. या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडलीय. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती. लाईव्ह सामन्या दरम्यान एका खेळाडूने सिगारेट मागवल्याची घटना घडली.

Updated: Jan 4, 2023, 04:31 PM IST
Aus vs Sa : LIVE सामन्यादरम्यान क्रिकेटपटूने मैदानात मागवली सिगारेट, पाहा VIDEO title=

Australia vs South Africa, 3rd Test : टीम इंडियाने मंगळवारी श्रीलंकेविरूद्ध पहिला टी20 सामना जिंकला. हा सामना जिंकून त्याने 1-0 ने मालिकेत आघाडी घेतली. यासह क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत (Australia vs South Africa) टेस्ट सामने सुरू आहेत. या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडली आहे. चक्क एका खेळाडूने लाईव्ह सामन्यात सिगारेट मागवल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडिओची क्रिकेट वर्तुळाच एकच चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा : श्रीलंकेविरूद्ध गोलंदाजीत कमाल आता Networthची चर्चा

नेमकी घटना काय?

ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेत (Australia vs South Africa) तीन सामन्यांची टेस्ट मालिका सुरू आहे. या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडलीय. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती. लाईव्ह सामन्या दरम्यान एका खेळाडूने सिगारेट मागवल्याची घटना घडली. मैदानावरील खेळाडूची ही मागणी पाहून प्रेक्षकांसह अंपायर्स आणि प्रतिस्पर्धी खेळाडू आश्चर्यचकीत झाले होते.

व्हिडिओत काय?   

तिसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाची (Australia) पहिली बॅटींग सुरू आहे. या बॅटींगदरम्यान ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा क्रिजवर आहे. या बॅटींग दरम्यान अचानक मार्नस लाबुशेनने (Marnus Labuschagne) पव्हेलियनकडे इशारा करत लाईटरची मागणी केली,त्यानंतर त्याने सिगारेट फुकायचे आहे, असाही संदेश देण्याचा प्रयत्न केला.त्याचा हा इशारा पाहून सर्व बुचकळ्यात पडले होते. कारण सर्वांना असे वाटत होते की, लाबुशेनला मैदानावर सिगारेट फुकायची आहे.मात्र मैदानावर लायटर पोहोचताच वेगळीच घटना घडली. 

मैदानात का मागवली सिगारेट? 

खरं तर मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) त्याच्या हेल्मेटचा थोडा त्रास होत होता. हेल्मेटच्या आतील काही भाग सैल असल्यामुळे त्याला बॅटींग करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे ही अडचण दुरुस्त करण्यासाठी त्याने दुसर हेल्मेट मागवण्याऐवजी,लायटर मागवले होते. हे लायटर पव्हेलियनमध्ये बसलेल्या खेळाडूंना कळावे यासाठी, त्याने सुरुवातीला लायटरची अॅक्शन केली, त्यानंतर त्याने सिगारेट फुकायची अॅक्शन देखील केली.त्यामुळे काही क्षणासाठी सर्वांनाच वाटले की, त्याला मैदानावर सिगारेट फुकायचे आहे. 

लायटरचं केलं काय?

मार्नस लाबुशेनने (Marnus Labuschagne) मैदानात लायटर मागवून त्याचे हेल्मेट स्वत:च दुरूस्त केले. त्याच्या हेल्मेटमधील काही भाग त्याला अडसर ठरत होता. तो भाग त्याने जाळला आणि पुन्हा हेल्मेट घालून खेळण्यास सुरूवात केली. मात्र आता त्याने लायटर मागवल्याच्या अॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची एकच चर्चा आहे.

 

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव    

तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट गमावून 147 धावा केल्या आहेत. डेविड वॉर्नर 10 धावा करून लवकर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मार्नस लाबुशेन  (Marnus Labuschagne) आणि उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) डाव सावरला. मार्नस लाबुशेन 79 धावा करून बाद झाला आहे. तर उस्मान ख्वाजा अर्धशतक ठोकून नाबाद आहे. 

दरम्यान या मालिकेत ऑस्ट्रेलियाने (Australia) दोन सामने जिंकले आहेत. तर तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो सारखा आहे. जर दक्षिण आफ्रिका हरली तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम शर्यतीतून बाद होतील.तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सध्या ऑस्ट्रेलिया WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी दिलासा आहे.