मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. हा सामना रोमांचक ठरला होता. 15 व्या षटकापर्यंत असं वाटत होतं की, पाकिस्तानी टीम जिंकू शकते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीने सामना जिंकला. यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी विविध प्रतिक्रीया दिल्या आहेत.
जावयावर भडकला अफ्रिदी
माजी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने म्हटले की, 'शाहिनने 19 व्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करायला हवी होती.
मी शाहिनच्या कामगिरीवर नाखुश आहे. जर त्या ओवरमध्ये हसन अलीने कॅच ड्राप केला तर, याचा अर्थ हा नाही की, त्याने गोलंदाजीची लय गमवावी. शाहिनची ही ओवर खुप महागात पडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.'
शाहिद अफ्रिदीने म्हटले की, 'शाहिन चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे उत्तम वेग आहे. त्यांने मोठ्या हुशारीने सेमीफायनलमध्ये याचा वापर करायला हवा होता.'
शाहिनने 4 षटकांत 35 धावा देऊन एका फलंदाजाला बाद केले.
लवकरच शाहिदच्या मुलीचा साखरपुढा
माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीची मुलगी अक्साचा साखरपुढा शाहिन अफ्रिदीसोबत होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्य माहितीनुसार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.