Veteran Cricketer Hospitalized : आशियामधील ब्रॅडमन म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास यांना लंडनमधील (zaheer abbas hospitalized) एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. स्थानिक माध्यमांनुसार, अब्बास यांना पॅडिंग्टन येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर 3 दिवसांनी त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. (asian bradman former pakistani legendary batter zaheer abbas hospitalized due to covid 19 at london)
अब्बास यांना लंडन दौऱ्यादरम्यान कोरोनाची लागण झाली. तसेच अब्बास यांनी किडनीचा त्रास असल्याचंही सांगितलं होतं. तसेच लंडनला पोहचल्यानंतर त्यांना निमोनिया झाला होता. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, "अब्बास सध्या डायलेसिसवर आहेत. अब्बास यांना इतरांना न भेटण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे".
अब्बास यांनी 1969 साली न्यूझीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. अब्बास यांनी 72 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. या 72 सामन्यांमध्ये अब्बास यांनी 5 हजार 62 धावा केल्या. तर 62 वनडे मॅचमध्ये 2 हजार 572 रन्स केल्या.
तसेच 459 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 108 शतकं आणि 158 अर्धशतकांसह 34 हजार 843 धावा केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अब्बास यांनी 1 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यात सामनाधिकारी पदाची (Match Refree) जबाबदारी पार पाडली.