Cricket News : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) भारताचं (Team India) आव्हान संपुष्टात आल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांची( India Cricket Fans) मोठी निराशा झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर टीका होतेय. याला कारण म्हणजे भारतात क्रिकेटची मोठी क्रेझ आहे. क्रिकेट म्हणजे भारतात धर्म मानला जातो. क्रिकेटपटूंची खेळण्याची पद्धत, त्यांचा लूक, त्यांची स्टाईल युवा फॅन्स कॉपी करत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही क्रिकेट फॅन्सना असते.
भारतीय क्रिकेटर्सही अनेक कार्यक्रमात मैदानात आणि मैदानाबाहेर घडलेल्या गमतीजमती सांगत असतात. अशाच एका कार्यक्रमात शिखर धवन (Shikhar Dhavan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने टीम इंडियातल्या काही खेळाडूंच्या धमाल गोष्टी सांगतिल्या. कपिल शर्मा कार्यक्रमात (The Kapil Sharma Show) शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सहभागी झाले होते. कपिल शर्माने या दोघांना काही मजेशीर प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना या दोघांनीही तितकीच मजेशीर उत्तरं दिली.
रॅपिड फायर प्रश्न
कपिल शर्माने शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना रॅपिड फायर प्रश्न विचारले. यात एक प्रश्न होता टीम इंडियात सर्वात कंजूष खेळाडू कोण आहे? या प्रश्नावर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी मनसोक्त हसत अष्टपैलू रविंद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) नाव घेतलं. याचा एक किस्साही या दोघांनी सांगितला. रणजी ट्रॉफी क्रिकेट (Ranji Trophy) स्पर्धेदरम्यान अनेकवेळा खेळाडू हॉटेलमध्ये जेवायला जायचे. पण जेव्हा बिल भरायची वेळ यायची तेव्हा नेमका रविंद्र जडेजा गायब व्हायचा.
त्यावेळी आम्ही ज्युनिअर खेळाडू होतो म्हणून आम्हाला या गोष्टी माहित नव्हता. यानंतर कपिल शर्माने टीम इंडियातला सर्वात भेदक गोलंदाज कोण असा प्रश्न विचार. यावर पृथ्वी शॉने ईशांत शर्माचं (Ishant Sharma) नाव घेतलं. टीम इंडियातला आळशी खेळाडूबाबत विचारला असता शिखर आणि पृथ्वी या दोघांनीही रोहित शर्मांच (Rohit Sharma) नावं घेतलं. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात विराट कोहलीनेही आळशी खेळाडू म्हणून रोहित शर्माचंच नाव घेतलं होतं. रोहित शर्मा कुठेही आणि कधीही झोपतो असं त्यांनी सांगितलं.