फायनलमध्ये पाकिस्तान हरल्यावर विराट, रोहितने 'हृदयी वसंत फुलताना...' गाण्यावर धरला ताल?,Video व्हायरल

आशिया कपमध्ये फायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Updated: Sep 12, 2022, 02:47 PM IST
फायनलमध्ये पाकिस्तान हरल्यावर विराट, रोहितने 'हृदयी वसंत फुलताना...' गाण्यावर धरला ताल?,Video व्हायरल title=

Viral Video : आशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका टीम 'एशिया चॅम्पिअन' ठरली आहे. आशिया कपचा भारत आणि पाकिस्तानला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र श्रीलंकेच्या संघाने पहिला सामना गमवला तरीसुद्धा सांघिक कामगिरीच्या जोरावर थेट आशिया कप आपल्या नावावर केला आहे. भारतीय चाहत्यांचा फायनलमध्ये श्रीलंकेच्या संघाला सपोर्ट होता. श्रीलंकेच्या विजयामुळे भारतीय फॅन्सही आनंदी झाले आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये विराट, रोहित, चहल, पांड्या आणि पंत दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ एका चार ते पाच मुलांचा असून त्यामध्ये मुलांच्या चेहऱ्यावर भारतीय खेळाडूंचे फोटो लावले आहेत. 'हृदयी वसंत फुलताना....' गाणं वाजत आहे. 

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीमर्सनी अनेक व्हिडीओ आणि मीम्स बनवले आहेत. अशाच प्रकारचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरील sarcasmpolitics या युजरने हा व्हिडीओ एडिट करत पोस्ट केला आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या विजयासह श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कपावर नाव कोरलं आहे. तर पाकिस्तान संघ तिसऱ्यांदा आशिया कपावर नाव कोरण्यापासून हुकला आहे. श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार भानुका राजपक्षा ठरला आहे.  23 धावांनी श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या 171 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 147 मध्येच गुंडाळला.