India vs Pakistan : आशिया कपमध्ये 'या' फॉर्म्युलाने उडवणार पाकिस्तानचा धुव्वा, रोहित शर्माचा मोठा निर्णय

Rohit Sharma: आशिया कप 2022 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे 

Updated: Aug 9, 2022, 08:23 PM IST
India vs Pakistan : आशिया कपमध्ये 'या' फॉर्म्युलाने उडवणार पाकिस्तानचा धुव्वा, रोहित शर्माचा मोठा निर्णय title=

Asia Cup 2022 : क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता लागली आहे ती आशिया कप स्पर्धेची (Asia Cup 2022). आशिया कप 2022 स्पर्धा यंदा UAE मध्ये खेळवली जाणार आहे. युएईमध्येच मागची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली गेली होती आणि यात टीम इंडियाची (Team India) कामगिरी अतिशय निराशाजनक होती. आता पुन्हा एकदा भारतीय संघ याच देशात क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 

आशिया कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने सामने उभे ठाकतील. सामन्या आधीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत रोहितने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतल्या पराभवानंतर संघात काय-काय बदल केले आहेत आणि संघाची रचना कशी असेल याबाबत माहिती दिली आहे. 

रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. यावेळी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया नव्या रणनितीसह मैदानात उतरेल असं रोहित शर्माने म्हटलं आहे. दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंततर खेळण्याची पद्धत आणि दृष्टीकोण बदलण्याची गरज आहे, त्या दृष्टीने खेळाडूंवर मेहनत घेण्यात आली असल्याचं रोहितने सांगितलं.

खेळाडूंना दिली सवलत
रोहित शर्माने सांगितलं, खेळाडूंवर कोणतंही दडपण न टाकता त्यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न सुरु आहे. संघाचा कर्णधार आणि कोचने एक निश्चित मार्ग ठरवला की संघातील खेळाडूंसाठी त्या दिशेने प्रयत्न करणं अधिक सोप होतं, त्यामुळे खेळाडूंमध्येही उत्साह निर्माण होण्यास मदत होईल असं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

कोच द्रविडसोबत आखली रणनिती
भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांच्यासोबत एक खास रणनिती आखल्याचं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं आहे. टीमला जास्तित जास्त विजय मिळवून देण्यासाठी संघात नवी उर्जा निर्माण करण्याचा उद्दीष्ट आम्ही ठेवलं आहे, आणि निश्चितपणे यात यश येईल असं रोहित शर्माने सांगितलं आहे.