Virat Kohli : विराटला सूर गवसला, हाँगकाँगनंतर पाकिस्तान विरुद्ध दमदार अर्धशतक

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहलीला (Virat Kohli) सूर गवसलाय.

Updated: Sep 4, 2022, 10:05 PM IST
Virat Kohli :  विराटला सूर गवसला, हाँगकाँगनंतर पाकिस्तान विरुद्ध दमदार अर्धशतक title=

यूएई : टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहलीला (Virat Kohli) सूर गवसलाय. विराट अनेक महिन्यांपासून सातत्याने अपयशी ठरलेला. मात्र विराटने पुन्हा कमबॅक करत आपल्याला रनमशीन का म्हणतात हे सिद्ध करुन दाखवलंय. विराटने पाकिस्तान विरुद्ध शानदार अर्धशतक ठोकलंय. यासह विराटची आशिया कपमधील सलग दुसरी अर्धशतकी खेळी ठरलीय.
(asia cup 2022 ind vs pak team india virat kohli back to back half century against pakistan after hongkong)

विराटने पाकिस्तान विरुद्ध 44 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 60 धावांची खेळी केली. विराट टीम इंडियाकडून या सामन्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटच्या या खेळीमुळे पाकिस्तानसमोर 182 धावांचे आव्हान ठेवता आले.

विराटचं आशिया कपमधील सलग दुसरं अर्धशतक ठरलंय. याआधी विराटने हाँगकाँग विरुद्ध जोरदार बॅटिंग करत हाफ सेंच्युरी झळकावली होती. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर विराटचं कमबॅक टीम इंडियासाठी चांगले संकेत आहेत. त्यामुळे आता विराटकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.