IND vs PAK: पाकविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने रचला इतिहास, केला सर्वात मोठा विश्वविक्रम

पाकिस्तान विरुद्धच्या सामान्यात रोहितने  एक मोठा विश्वविक्रम केला आहे

Updated: Sep 4, 2022, 09:22 PM IST
IND vs PAK: पाकविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने रचला इतिहास, केला सर्वात मोठा विश्वविक्रम title=

Asia Cup 2022 : भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय (T20I) क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. आशिया कप 2022 च्या सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध रोहितने 12 धावा करत एक मोठा विश्वविक्रम केला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माने केला आहे.

पुरुषांच्या यादीत रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी 3520 धावांसह अव्वल स्थानावर होता. पण महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्सने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या. सुजीच्या नावावर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 3531 धावा होत्या. पण आता रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 12 धावा करून सुझी बेट्सला मागे टाकत टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित 28 धावा करून बाद झाला. त्याने 16 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले.  रोहितला हॅरिस रौफने खुशदिल शाहच्या हाती झेलबाद केले.

रोहितच्या नावावर आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3548 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या (महिला आणि पुरुष) यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

आपल्या टी20 कारकिर्दीत, 35 वर्षीय रोहित शर्मान 27 अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. पुरुष क्रिकेटपटूंमध्ये, मार्टिन गप्टिल (Martin Guptill) (3497) आणि विराट कोहली  ( Virat Kohli )(3402) अव्वल स्थानाच्या शर्यतीत शर्मा यांच्यापेक्षा फारसे मागे नाहीत.