टी २० साठी टीमची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

 टी २० सामन्यांसाठी आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक यांची निवड करण्यात आली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 2, 2017, 12:50 PM IST
 टी २० साठी टीमची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी title=

नवी दिल्ली : रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २०  मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी २० सामन्यांसाठी आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक यांची निवड करण्यात आली आहे. ७ ऑक्टोबरला रांची, १० ऑक्टोबरला गुवाहाटी, तिसरा आणि शेवटचा टी २० सामना हैदराबादमध्ये १३ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

आशिष नेहराचे नाव सर्वांसाठी आश्चर्यजनक आहे. ३८ वर्षाचा सिनिअर खेळाडू नेहरा ८ महिन्यांनंतर संघात परतला आहे. फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी २० सामन्यात तो खेळला होता. आशिष नेहरा आपल्या टी २० च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २६ सामने खेळला असून त्यामध्ये ३४ विकेट्स घेतल्या आहेत. नेहराव्यतिरिक्त दिनेश कार्तिकला या संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय शिखर धवनला देखील या टीममध्ये आहे. जून २०१७ मध्ये कार्तिक वेस्ट इंडीजविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. रहाणे, उमेश यादव आणि मो.शमीला  एकदिवसीय मालिकेत असणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

टी २० साठी टीम इंडिया:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), हरदीप पंड्या, कुलदीप यादव, यजुवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल