मुंबई : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन तेंडुलकरनं पुन्हा एकदा आपल्या कामगिरीनं सा-यांचं लक्ष वेधून घेतलय.
अर्जुननं कूच बिहार अंडर 19 ट्रॉफीमध्ये पाच विकेट्स घेत सा-यांची वाहवा मिळवलीय. मध्य प्रदेश विरुद्ध दुस-या इनिंगमध्ये अर्जुननं पाच विकेट्स घेतल्या.
मध्य प्रदेशनं पहिल्या इनिंगमध्ये 361 रनिस केल्या. तर मुंबईनं पहिल्या इनिंगमध्ये 506 रन्स करत आघाडी घेतली. यानंतर दुस-या इनिंगमध्ये मध्य प्रदेश 411 रन्स करु शकली. दुस-या इनिंगमध्ये अर्जुन तेंडुलकरनं मध्य प्रदेशच्या टॉप बॅट्समनला आऊट केलं.
दरम्यान ही मॅच ड्रॉ झाली. डावखुरा फास्ट बॉलर असलेला अर्जुन तेंडुलकरनं विराट कोहलीला नेटमध्ये बॉलिंग केली होती आणि लॉर्ड्सवर त्यानं इंग्लंडचा बॅट्समनला आऊट केलं होतं तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती.