MI vs PBKS: आयपीएलच्या (IPL 2023) 31 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध पंजाब किंग्ज (MI vs PBKS) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. तर पंजाब किंग्जच्या टीमचं नेतृत्व कोण करणार याकडे लक्ष असणार आहे. त्यापूर्वी टीमची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर एक नजर टाकूया...
गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा सिझन खूप चांगला असल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत मुंबईच्या टीमचे पाच सामने झाले असून 3 सामन्यात मुंबईला विजय मिळालाय तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र आजचा सामना जिंकून टॉप 4 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मुंबईची टीम करणार आहे.
सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन मुंबईच्या टीमकडून ओपनिंग करतात. या दोघांचाही खेळ चांगला असून आजच्या सामन्यात देखील ही जोडी पहायला मिळू शकते. मात्र आजच्या सामन्यात इशान आणि रोहित या दोघांकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
आजच्या सामन्यात मिडल ऑर्डरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सची टीम सूर्याच्या ऐवजी कॅमरून ग्रीनला तिसऱ्या नंबरला फलंदाजीसाठी पाठवू शकते. यावेळी ग्रीनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. ग्रीननंतर सूर्या फलंदाजीसाठी उतरू शकतो. यंदाच्या सिझनमध्ये सूर्याकडून काही खास फलंदाजी होताना दिसत नाहीये.
फलंदाजी क्रमात सूर्यानंतर तिलक वर्मा, टीम डेविड यांना संधी मिळणार आहे. मात्र प्रश्न आहे तो म्हणजे अर्जुन तेंडुलकरचा. आजच्या सामन्यात अर्जुनला संधी मिळणार का हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. मात्र आजच्या सामन्यात 7 व्या नंबरवर अर्जुन फलंदाजीसाठी उतरू शकतो.
मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजीची कमान पुन्हा एकदा जेसन बेहरेनडॉर्फकडे असणार आहे. तर रिले मेरेडिथ याला देखील टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता सुरु आहे. याशिवाय स्पिनर म्हणून पियुष चावला आणि हृतिकला याचा समावेश केला जाईल. अर्जुन तेंजुलकरकडे देखील गोलंदाजीची धुरा असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, ऋतिक शौकीन, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर, नेहल वडेरा, जेसन बेहरेनडोर्फ, रिले मेरेडिथ (इम्पॅक्ट प्लेयर)