Arjun Tendulkar News : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलपूर्वी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोव्यासाठी खेळताना धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतं. डावखुरा वेगवान गोलंदाज असताना देखील अर्जुनने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ज्यामुळे त्याचं सध्या कौतूक होताना दिसतंय. आयपीएलमध्ये अर्जुनला खास कामगिरी करता आली नव्हती. आता त्याने रणजी सामन्यात वादळी खेळी करून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचं टेन्शन कमी केलंय. 6 खणखणीत फोर आणि 4 गगनचुंबी षटकाराच्या मदतीने अर्जुन तेंडूलकरने धावा कुटल्या.
अर्जून तेंडूलकरने 116.67 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. अर्जुन तेंडुलकरने 60 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीवरून तो या सामन्यात शतक ठोकेल असं वाटत होतं. मात्र, शतकाकडे वाटचाल करत होता पण अर्सलान खानच्या एका चेंडूवर अर्जुन बाद झाला. कुणाल महाजनने एक भन्नाट कॅच घेत अर्जुनला तंबूत पाठवलं. पहिल्या रणजी सामन्यात अर्जुन त्रिपुराविरुद्ध विशेष काही करू शकला नव्हता. पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात मिळून 21 धावा केल्या. तर त्याला फक्त 2 विकेट्स मिळाल्या आहेत.
गोवा विरुद्ध चंदीगड सामन्यात सुयश प्रभुदेसाईने 197 धावांची धुंवाधार खेळी केली. तर दिपक गोयंकरने 115 धावा कुटल्या. त्याचबरोबर कृष्णामुर्ती सिद्धार्थने 77 धावांची खेळी केली. त्याचबरोबर अर्जुने केलेल्या आक्रमक खेळीमुळे गोव्याला मजबूत आघाडी मिळाली आहे. आत्तापर्यंत झालेल्या गोलंदाजीमध्ये अर्जुनने 4 ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या आहेत.
गोव्याची प्लेइंग इलेव्हन
ईशान गाडेकर , सुयश प्रभुदेसाई , मोहित रेडकर , अर्जुन तेंडुलकर , स्नेहल कौठणकर , राहुल त्रिपाठी , कृष्णमूर्ती सिद्धार्थ (विकेटकीपर), लक्ष्य गर्ग, दर्शन मिसाळ (क), दीपराज गावकर, विजेश प्रभुदेसाई
चंदीगडची प्लेइंग इलेव्हन
मनन वोहरा (सी), अर्सलान खान, हरनूर सिंग, गौरव पुरी, कुणाल महाजन, अर्पित पन्नू, मुरुगन अश्विन, जगजीत सिंग, राज अंगद बावा, संदीप शर्मा, मयंक सिद्धू (विकेटकीपर)