Arjun tendulkar : आयपीएल 2023 ( IPL 2023 ) पासून दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun tendulkar ) अखेर चर्चेत आला आहे. जवळपास 3 वर्षानंतर अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यु केला. यावेळी मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) अर्जुनने 4 सामने खेळल. दरम्यान नुकतंच टीम इंडियाच्या एका महिला खेळाडून अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच या महिला खेळाडूने अर्जुनसोबतच्या ( Arjun tendulkar ) तिच्या नात्याचाही खुलासा केला आहे.
भारतीय महिला टीमची खेळाडू जेमिमा रोड्रिग्स प्रभावी खेळाडू मानली जाते. नुकतंच जेमिमा रोड्रिग्सने ( Jemimah Rodrigues ) अर्जुन तेंडुलकरसोबत ( Arjun tendulkar ) एक फोटो शेअर केला आहे. या दोघांसोबत या फोटोमध्ये कोच प्रशांत शेट्टी देखील दिसून येतेय. मैदानावर प्रॅक्टिस सेशननंतरचा हा फोटो आहे.
अर्जुन सोबतचा फोटो पोस्ट करत जेमिमाने ( Jemimah Rodrigues ) एक उत्तम कॅप्शन देखील लिहिलं आहे. मुख्य म्हणजे हे दोन्ही खेळाडू एकमेकांना अंडर - 12 पासून ओळखत असल्याचं समोर आलंय. जेमिमाने ( Jemimah Rodrigues ) तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, अंडर - 12 च्या दिवसांपासून ते आता पर्यंत.... आम्ही एक लांबचा पल्ला गाठला आहे!
याचाच अर्थ जेमिमा आणि अर्जुन एकमेकांचे लहान पणापासूनचे मित्र आहेत. त्याचं हे मैत्रीचं नातं अंडर - 12 पासून असल्याचं जेमिमाने म्हटलंय.
जेमिमा ( Jemimah Rodrigues ) आणि अर्जुन ( Arjun tendulkar ) सध्या क्रिकेट प्रॅक्टिस एकत्र करतायत. नुकतंच जेमिमाने नॅशनल टीमसाठी डेब्यू केलाय. जेमिमा बांगलादेशविरुद्धच्या आगामी तीन वनडे आणि टी-20 सिरीजच्या तयारीत व्यस्त आहे. जेमिमाने टीम इंडियासाठी 21 वनडे सामने आणि 80 टी-20 सामने खेळले आहेत. येत्या काळात जेमिमाला भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कर्णधारपदाची दावेदार मानलं जातंय.
दुसरीकडे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun tendulkar ) अजून टीम इंडियामध्ये डेब्यू करण्याच्या प्रतिक्षेत आहे. 23 वर्षीय अर्जुनने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 27 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 35 विकेट्स घेतल्या आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुनने ( Arjun Tendulkar ) डेब्यू केला. अर्जुनला मुंबईकडून केवळ 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. यावेळी 4 सामन्यांमध्ये अर्जुनला 3 विकेट्स घेण्यास यश मिळालं. यानंतर त्याला टीममध्ये खेळण्याची संधी दिली नाही. याशिवाय एका सामन्यात फलंदाजी करताना अर्जुनने 9 बॉल्समध्ये 13 सामन्यांची खेळी केली होती.