अर्जुन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली विकेट, शुभेच्छांचा वर्षाव

अर्जुन तेंडुलकरची पहिल्या सामन्यात पहिली विकेट

Updated: Jul 17, 2018, 01:45 PM IST
अर्जुन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली विकेट, शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : भारतीय क्रिकेट अंडर-19 टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. आजपासून सामन्याला सुरुवात झाली आहे. या पहिल्या सामन्यात क्रिकेटचा शंहशाह सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील चर्चेत आला आहे. टीममध्ये संधी मिळाल्यानंतर तो चर्चेत आला होता पण आता पहिल्या सामन्यात पहिली विकेट घेतल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिली विकेट घेतली आहे. अर्जुन तेंडुलकरची ऑलराउंडर म्हणून अंडर-19 टीममध्ये निवड झाली आहे.

कोलंबोच्या नॉनड्स्क्रिप्ट क्रिकेट क्लब ग्राउंडवर सुरु असलेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने करिअरची सुरुवात केली. या सामन्यात अर्जुनने भारतीय टीमला सुरुवातीलाच विकेट मिळवून दिली. अंडर-19 टीमचा कर्णधार आणि विकेटकीपर अनुज रावतने पहिली ओव्हर अर्जुन तेंडुलकरला दिली. दुसरी ओव्हर त्याने आकाश पांडेला दिली. श्रीलंका अंडर-19 टीमचा कर्णधार निपुण धनंजय याने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अर्जुन तेंडुलकरने पहिली विकेट घेतली. श्रीलंकेला पहिला झटका कामिल मिसाराच्या रुपात लागला. कामिल मिसारा एलबीडब्लू झाला. मिसारा 11 बॉलमध्ये 9 रन करत आऊट झाला. 

पाहा लाईव्ह सामना

अर्जुन तेंडुलकरच्या या पहिल्या यशानंतर सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. अर्जुनसह फॅन्स सचिन तेंडुलकरला देखील शुभेच्छा देत आहेत.