विराट झाला आऊट, अनुष्काला धरले जबाबदार

लग्नानंतर पहिल्यांदाच विराट सोबत साऊथ आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या अनुष्का शर्माला पुन्हा ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. विराटच्या खराब प्रदर्शनाबद्दल यावेळीही तिलाच जबाबदार धरले जात आहे. 

Updated: Jan 6, 2018, 04:32 PM IST
विराट झाला आऊट, अनुष्काला धरले जबाबदार  title=

केपटाऊन : लग्नानंतर पहिल्यांदाच विराट सोबत साऊथ आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या अनुष्का शर्माला पुन्हा ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. विराटच्या खराब प्रदर्शनाबद्दल यावेळीही तिलाच जबाबदार धरले जात आहे. 

इतर क्रिकेटर्सच्या पत्नींप्रमाणे अनुष्काही भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच स्टेडिअममधून पाहत होती.

विराट चांगली फलंदाजी करेल अशी तिलाही अपेक्षा होती.

पण नेमक उलट झाल आणि विराट ५ रन्स बनवून आऊट झाला. 

यानंतर सोशल मीडियावर पुन्हा अनुष्कालाच यासाठी जबाबदार धरण्यात आले.

'विराटने अनुष्कासोबतच्या लंचवर नाही तर क्रिकेटवर लक्ष द्यायला हवे' असे एका युजरने लिहिले.

'अनुष्का विराटला म्हणते, थॅक्स डार्लिंग माझा येणारा सिनेमा झिरोचे प्रमोशन केल्याबद्दल,' असेही एक युजरने लिहिले आहे. 

महात्मा गांधींनाही साऊथ आफ्रिकेत संघर्ष करावा लागला होता असेही एक ट्विट पाहायला मिळते. 

विराटच्या मैदानातील खेळाचा राग अनुष्कावर काढल्याचे दिसून येत आहे.