युजवेंद्र चहल आणि Andrew Symonds खास नातं

Andrew Symonds च्या घरची ही डिश युजवेंद्र चहल 'बोटं चाटून' खायचा

Updated: May 15, 2022, 10:43 AM IST
युजवेंद्र चहल आणि Andrew Symonds खास नातं title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपल्या बॉलिंगने सध्या युजवेंद्र धुमाकूळ घालत आहे. युजवेंद्रच्या आयुष्यात एक धक्कादायक गोष्ट घडली. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. युजवेंद्रच्या आयुष्यात तर विशेष पोकळी निर्माण झाली आहे. 

अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाला. युजवेंद्र चहल आणि सायमंडसचं खास नातं होतं. त्यामुळे युजवेंद्रला सायमो अंकलची कमतरता जाणवणार आहे. 

युजवेंद्र आणि सायमंड्स यांची मैत्री 2011 मध्ये आयपीएल सामन्यांच्या निमित्ताने झाली होती. हे दोन्ही मुंबईकडून खेळत होते. तिथून सुरू झालेलं मैत्रीचं नातं कधी खूप घट्ट झालं कळलंच नाही. 

युजवेंद्र सायमंड्सच्या घरी ऑस्ट्रेलियामध्ये जायचा तेव्हा तेव्हा तो त्याच्या पत्नीच्या हातचं बटर चिकन न विसरता खायचा. त्याला ती डिश खूप जास्त आवडायची. युजवेंद्रसाठी खास त्याची पत्नी बटर चिकन शिकली होती. 

युजवेंद्र आणि सायमंड्स एकत्र फिशिंगसाठीही न चुकता ऑस्ट्रेलियामध्ये असताना जायचे. सायमंड्स आणि त्याच्या पत्नीने युजवेंद्रला एप्पल नाव ठेवलं होतं. त्यांच्यातलं हे खास नातं आणि खास किस्से युजवेंद्रने सांगितले होते. आता सायमंड्स नसल्याने एक मोठी पोकळी युजवेंद्रच्या आयुष्यात निर्माण झाली आहे.